Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी ३२१ कोरोनाबाधितांची वाढ; ३५३ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 22:29 IST2021-01-06T22:29:12+5:302021-01-06T22:29:33+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ६८७

Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी ३२१ कोरोनाबाधितांची वाढ; ३५३ जण कोरोनामुक्त
पुणे : शहरात बुधवारी ३२१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३५३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ५ हजार ४१४ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५.९२ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३२१ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या ३५९ इतकी आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ६८७ इतकी आहेत. आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ५ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६६० इतकी झाली आहे़
आजपर्यंत शहरात ९ लाख ४० हजार ९७४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८० हजार २८७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७२ हजार ९४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.