Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी २ हजार ३४२ तर पिंपरीत ११८७ कोरोना रूग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:21 IST2021-03-22T21:20:59+5:302021-03-22T21:21:25+5:30
पुणे आणि पिंपरीत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.

Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी २ हजार ३४२ तर पिंपरीत ११८७ कोरोना रूग्णांची वाढ
पुणे : शहरात सोमवारीही कोरोनाबाधितांची वाढ कायम असली तरी, एकूण तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २० टक्क्यांच्या आत आल्याचे थोडेसे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळाले आहे. आज दिवसभरात ११ हजार ८९० जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ हजार ३४२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ही टक्केवारी १९.६९ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २३ हजार ६२ इतकी झाली आहे़ सध्या शहरात ५२४ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ९५८ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत. आज दिवसभरात १ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे़ दरम्यान आज दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत.
शहरात आजपर्यंत १३ लाख ३८ हजार ६८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३७ हजार ७३६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ९ हजार ६०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ६८ इतकी झाली आहे.
================
पिंपरीत ११८७ पॉझिटिव्ह रुग्ण
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा वाढला असून ११८७ जण पॉझिटिव्ह आढळले असून ८८६ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे अकरा जणांचा बळी गेला आहे. गेल्या चार महिन्यात एक दिवशी अकरा जण मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे.
पिंपरी चिंचवड शहरात दाखल रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. औद्योगिकनगरीतील विविध रुग्णालयात ६ हजार १०९ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ४ हजार ८४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ११० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या १ हजार ८८३ वर पोहोचली आहे. आज ६५ हजार ७८३ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना कोरोनामुक्तीचा आलेखही कमी झाला आहे. दिवसभरात ८४६ कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ४०४ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ५५२ हजार ७३८ वर पोहोचली आहे.
.......
मृत्युदर वाढला
कोरोनाचा विळखा वाढत असून मृत्युदर वाढत आहे. दिवसभरात ११ जणांचा कोरोनाने झाला आहे.त्यात सात पुरूष आणि चार महिलेचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ९२३ वर पोहोचली आहे.