Corona Virus News : 1,105 people released from corona in Pune on Monday; 779 new patients | Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०५ जण कोरोनामुक्त ; ७७९ नवे रुग्ण 

Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०५ जण कोरोनामुक्त ; ७७९ नवे रुग्ण 

ठळक मुद्देसद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९४३ कोरोनाबाधित गंभीर रूग्णांवर उपचार सुरूदिवसभरात उपचारादरम्यान शहरात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यूअ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या १७ हजार २२८ इतकी

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सोमवारीही कायम राहिले असून, आज १ हजार १०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची वाढ मोठ्या प्रमाणात रोडावली असून, रविवारचे बाकी चाचणी अहवाल व आजचे अहवाल पाहता आज केवळ ७७९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९४३ कोरोनाबाधित गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ५२० जण व्हेंटिलेटरवर तर ४२३ जण आयसीयूमध्ये आहेत. तर ३ हजार ३९३ रूग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात उपचारादरम्यान शहरात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. 
    शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आजअखेर १ लाख ४२ हजार ९१५ झाली असून, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या १७ हजार २२८ इतकी आहे. रविवारच्या तुलनेत आज अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या सुमारे ३०० ने कमी झाली आहे.  
    आजपर्यंत एकूण बाधितांपैकी १ लाख २२ हजार २८१ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात आत्तापर्यंत ३ हजार ४०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.        

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus News : 1,105 people released from corona in Pune on Monday; 779 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.