Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ३६ नवे रुग्ण; १ हजार १७० जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 00:25 IST2020-10-02T00:19:00+5:302020-10-02T00:25:51+5:30
आत्तापर्यंत १ लाख २६ हजार ४३० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले.

Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ३६ नवे रुग्ण; १ हजार १७० जण कोरोनामुक्त
पुणे : पुणे शहरात दररोज पाच हजारांच्या पुढेच नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात येत असून, गुरूवारी ५ हजार २६० जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार ३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री आठवाजेपर्यंत १ हजार १७० जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ५१२ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर तर ४०१ रूग्ण हे आयसीयु विभागात उपचार घेत असून, ३ हजार १३३ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर आज ६० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरातील अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १६ हजार ३६९ इतकी आहे. तर आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या शहरात १ लाख ४६ हजार ३२७ झाली असून, यापैकी १ लाख २६ हजार ४३० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३ हजार ५२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
पुणे : पुणे शहरात दररोज पाच हजारांच्या पुढेच नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात येत असून, गुरूवारी ५ हजार २६० जणांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये १ हजार ३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.