शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

Corona virus : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ; रूग्णांची संख्या पोहचली २२०१ वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 12:08 PM

पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ.

ठळक मुद्देशहरात दिवसभरात ५२ रुग्ण झाले बरे : एकूण ७६ रुग्ण अत्यवस्थ तर ४ रुग्णांचा मृत्यूपुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ९४३ वर जिल्ह्यात आत्तापर्यंत ६०८ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवार (दि.५) रोजी एका दिवसांत ७९रूग्णांची वाढ झाली.तर पाच रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.पुणे जिल्ह्यातील शहरी भागात कोरोना विषाणूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये पुणे शहरामध्ये मंगळवारी ६३, पिंपरी चिंचवड शहरामध्ये १२ आणि कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण मध्ये ४  नवीन रूग्णांची भर पडली. यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २ हजार २०१ वर जाऊन पोहचली आहे. तर एकूण मृत्यू १२० झाले आहेत. आत्तापर्यंत ६०८ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ---- शहरात कोरोना रुग्णसंख्येत ६५ ची भरपुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ९४३ वर पोहचला असून मंगळवारी दिवसभरात ६५ रूग्णांची भर पडली. शहरात एकूण एक्टिव्ह रुग्ण १ हजार २९७ झाले आहेत. दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरात नव्याने ६५ रूग्णांची नोंद करण्यात आली.  शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी २० जण व्हेंटिलेटरवर असून ५६ जण आयसीयूत उपचार घेत आहेत.शहरात मंगळवारी चार मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १११ झाली आहे. एकूण ५२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५३५ झाली आहे.

पुणे जिल्हा एकूण : 2201पुणे शहर : 1939पिंपरी चिंचवड: 137कॅन्टोनमेन्ट: 80 ग्रामीण : 45 एकूण मृत्यु : 120बरे होऊन घरी गेलेले : 608

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका