Corona virus : पुणे शहरात बुधवारी ४२६ कोरोनाबाधितांची वाढ; सक्रिय रूग्णसंख्या ५ हजार २७२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 12:38 IST2020-11-26T12:38:14+5:302020-11-26T12:38:47+5:30
शहरातील संशयितांची तपासणीचा संंख्या आठ लाखांच्या पुढे

Corona virus : पुणे शहरात बुधवारी ४२६ कोरोनाबाधितांची वाढ; सक्रिय रूग्णसंख्या ५ हजार २७२
पुणे : शहरातील कोरोना तपासणीचे प्रमाण पुन्हा वाढले असून, बुधवारी ४ हजार ६५५ संशयित रूग्णांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे.यामध्ये ४२६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत आजची पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ही ९.१ टक्के इतकी आहे.
बुधवारी झालेल्या तपासण्यांसह शहरातील संशयितांची तपासणी संंख्या आजअखेर ८ लाखांच्या पुढे गेली असून, आत्तापर्यंत शहरात तब्बल ८ लाख २२६ जणांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे.यापैकी १ लाख ६८ हजार ३० जण कोरोनाबाधित आढळून आले असून, यापैकी १ लाख ५८ हजार ३१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ४ हजार ४४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील कोरोना पॉझिटिव्हची टक्केवारी ही गेल्या आठवड्यात १३ टक्क्यांच्या पुढे आली होती. परंतु, गेल्या दोन दिवसात संशयितांच्या तपासणीचे प्रमाण वाढले असले तरी, शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ही १० टक्क्यांच्या आसपासच असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पाचपर्यंत २५८ कोरोनाबाधित कोरानामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार २७२ इतकी आहे. तर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४०९ गंभीर रूग्णांवर सध्या उपचार सुरू असून, यापैकी २४७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार १०९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत.