पुणे : शहरात गुरूवारी ३८७ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३९३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ५ हजार ४३ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७़६ टक्के इतकी आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८८ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ६७८ इतकी आहेत. आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून,यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत.शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६६३ इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत ९ लाख ४६ हजार १७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८० हजार ६७४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.यापैकी १ लाख ७३ हजार ३३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Corona virus : पुणे शहरात गुरूवारी ३८७ कोरोनाबाधितांची वाढ ; ३९३ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 21:29 IST