Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ ; ४२१ झाले ठणठणीत बरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 21:16 IST2020-12-31T21:14:51+5:302020-12-31T21:16:38+5:30
पुणे शहरात १ लाख ७० हजार ८२१ जण कोरोनामुक्त..

Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ ; ४२१ झाले ठणठणीत बरे
पुणे : शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४२१ कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ८१९ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५़९ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २४६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १५२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६३४ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ३१७ इतकी आहेत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून,यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६३१ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ९ लाख १७ हजार १९५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७८ हजार ७६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. यापैकी १ लाख ७० हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.