शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Corona virus : पुणेकरांसाठी 'महत्वाची'बातमी : शहरातील सर्वात मोठे कोविड सेंटर महापालिकेने केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 2:06 PM

पुणे शहरातील साडे तीन हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या हे कोविड सेंटर पुणे महापालिका व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होते.

ठळक मुद्देपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये १७६ रुग्णांवर उपचार सुरू ; ३ हजार १४९ रुग्ण घेताहेत घरी उपचार

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच बहुतांश कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून होम आयसोलेशन चा पर्याय निवडला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पुण्यातील सर्वात मोठे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहरातील साडे तीन हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या विमाननगर येथील कोविड सेंटर पुणे महापालिका व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होते. मात्र शुक्रवारपासून ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नव्याने आढळून येणारी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी कमी होत आहे. त्याच धर्तीवर विमाननगर येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. 

कोरोना रूग्णांची संख्या घातल्याने रुग्णालयांमधील खाटा आता रिकाम्या राहू लागल्या आहेत. शहरात आजमितीस १२ हजार ८३४ खाटा रिकाम्या आहेत. तर, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८७ टक्क्यांवर आली आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने शहरात खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. खासगी तसेच शासकीय रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. 

शहरात सर्व प्रकारचे मिळून १५ हजार ४१७ बेड आहेत. रुग्णालयात २ हजार २८३ रुग्ण उपचार घेत असून १२ हजार ८३४ खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजनयुक्त ४ हजार ५८ खाटांपैकी २ हजार ५४४ खाटा रिकाम्या असून १ हजार ५१४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आसीयू ३३० आणि व्हेटिंलेटरचे २१६ बेड रिकामे आहेत.------

कोरोनाची शहरातील सध्याची स्थिती 

पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४८ हजार ३९३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ६२ हजार ६४७ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५२ हजार ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ४९७ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे़  आज दिवसभरात शहरात २ हजार ३७२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे़. 

पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १७६ रुग्णांवर उपचार सुरू असून ३ हजार १४९ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. 

 

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तMayorमहापौर