शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

Corona virus : हाँगकाँगचे 'लॉकडाऊन' विना कोरोनावर नियंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 12:55 PM

ठप्प न होता आवश्यक खबरदारी घेऊन दैनंदिन जनजीवन सुरळीत

ठळक मुद्दे २ एप्रिलअखेरपर्यंत ८०२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून चार जणांचा या रोगाने बळी ट्रेन, बस ही सार्वजनिक वाहतूकही अव्याहत सुरू शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे, जिम अशी सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद

अभय नरहर जोशी - पुणे : चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश असलेल्या हाँगकाँग चीनचा प्रदेश असून आणि चीनच्या एवढ्या जवळ असूनही जगभर थैमान घालत असलेल्या 'कोविड १९' म्हणजेच कोरोना विषाणूच्या साथीची तुलनेने खूपच कमी झळ बसली आहे. या प्रदेशात २ एप्रिलअखेरपर्यंत ८०२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून चार जणांचा या रोगाने बळी घेतला आहे. मूळचे मुंबईकर असलेले तेथील सिटी बँकेतील अधिकारी मंगेश रेळेकर यांच्याशी 'लोकमत'ने साधलेल्या संवादातून ही माहिती मिळाली.ब्रिटिशांकडून १९९७ मध्ये चीनमध्ये विलीन झालेल्या मात्र अद्याप स्वायत्त असलेल्या हाँगकाँगवासियांचा चिनी सत्ताधाऱ्यांशी तीव्र संघर्ष सुरू होता. मात्र हे आंदोलन नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ दरम्यान थंड होत नाही तोच जानेवारीपासून कोरोनाच्या साथीविषयीच्या बातम्या चीनमधून येऊ लागल्या. तरीही येथील जनजीवन सुरळीत सुरू होते. या वर्षीच्या १५ मार्चपर्यंत हाँगकाँगमध्ये २०० च्या आसपास कोरोनाबाधित होते, अशी माहिती देऊन रेळेकर यांनी सांगितले, की आता ही संख्या ८०० च्या दरम्यान जरी गेली असली तरी या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण येथे खूप कमी आहे. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.

असे असले तरी ७५ लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेले हाँगकाँग लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेले नाही. येथील शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे, जिम अशी सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद आहेत. मात्र, शाळा-महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज ऑनलाईन सुरू आहे. मात्र, येथील रेस्टॉरंट सुरू आहेत. मात्र, चारपेक्षा जास्त जणांना तेथे अजिबात एकत्र येता येत नाही. दोन टेबलमधील अंतरही एक मीटरवर ठेवण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम कडक केले आहेत व ते येथील नागरिकांकडून कसोशीने पाळले जात आहेत. येथील मॉल सुरू आहेत. ट्रेन, बस ही सार्वजनिक वाहतूकही अव्याहत सुरू आहे. सर्व नागरिक मास्क वापरून योग्य अंतर राखत दैनंदिन व्यवहार करत आहेत. सार्वजनिक स्वच्छता काटेकोरपणे पाळली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी हँड सॅनेटायझर ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे सिंगापूरप्रमाणे भारतीय लक्षणीय संख्येने नसले तरी महाराष्ट्र मंडळ आहे. भारतीय उपाहारगृहांतून भारतीय अन्न मिळू शकते, अशी माहितीही रेळेकर यांनी दिली.----------कोरोनाची अनावश्यक भीती न बाळगता किंवा काळजी करत न बसता हाँगकाँगवासीय आवश्यक ती काळजी घेत आहेत. मात्र, दैनंदिन व्यवहार त्यांनी ठप्प होऊ दिले नाहीत. कोरोनाचा उद्रेक झालेल्या चीनचाच एक प्रदेश असूनही त्यांनी कमालीच्या सकारात्मकतेने ते या संकटाचा सामना करत आहेत. भारतीयांना हाँगकाँगवासीयांचा हा आदर्श जरूर घेण्याजोगा आहे.- मंगेश रेळेकर, हाँगकाँगवासीय बँक अधिकारी 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार