शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

corona virus : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 08:55 IST

कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूमगाव येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास या सोळा जणांनी नाकाबंदी असताना कसा केला?

ठळक मुद्देचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; तीन पुरूष, चार महिला व अल्पवयीन नऊ मुले असे एकूण सोळा प्रवासी

वडगाव मावळ : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगा येथून मुंबई येथे वाहनाने जाणाऱ्या १६ जणांना वडगाव पोलिसांनी पकडले.  यामध्ये तीन पुरूष, चार महिला व अल्पवयीन असलेली नऊ मुले असे एकूण सोळा प्रवाशांचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता सर्वांच्या हातावर होमक्वारंटाईनचे शिक्के होते. त्यांना वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये पोलिस बंदोबस्तात होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु,कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूमगाव येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास या सोळा जणांनी नाकाबंदी असताना कसा केला हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मैनुद्दीन शरमुद्दीन शेख वय २९ रा.गौतमनगर, अंधेरी )असे गुन्हा दाखल केलेल्या चालकाचे नाव आहे पोलिस निरीक्षकसुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे वडगाव तळेगाव फाट्यावर नाकाबंदी करण्यात आली.तपासणी करताना कार  (एमएच ०२ सीआर ८८१०) यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले आढळले. यामध्ये तीन पुरूष, चार महिला व अल्पवयीन असलेली नऊ मुले असे एकूण सोळा प्रवाशांचा समावेश होता. यांची तपासणी केली असतात सर्वांच्या हातावर होमक्वारंटाईन शिक्के होते. हे सर्वजन २२ मार्च पासून मुरूमगाव येथे वास्तव्यास होते.त्यांची तेथील शासकीय रूग्णालयात तपासणी करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांची तळेगाव येथील जनरल हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय करून त्यांना वडगाव येथे ठेवण्यात आले. होम क्वारंटाईन असल्याने त्यांनी तिथेच राहणे आवश्यक असताना ते मुंबईला चालले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

.....

नाकाबंदीत ४०० किलोमीटर प्रवास केला कसा... या प्रकरणी माहिती मिळताच आमदार सुनिल शेळके घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाई व संबंधित प्रवाशांची माहिती घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक यांच्याशी संपर्क साधून या गंभीर प्रकाराची माहिती दिली. कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूमगाव येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास नाकाबंदी असताना कसा केला. असा सवाल शेळके यांनी केला असून नाकाबंदी अजून कडक करावी अशी मागणी केली. 

..............................

वडगावमध्ये घबराट....त्या सोळा जणांना वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये ठेवले असल्याने वडगाव मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर त्यांना अन्यजागी हालवा अशी मागणी युवकांनी केली आहे. 

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसpassengerप्रवासी