corona virus : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 08:48 AM2020-04-02T08:48:26+5:302020-04-02T08:55:08+5:30

कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूमगाव येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास या सोळा जणांनी नाकाबंदी असताना कसा केला?

corona virus : Home quarantine people who travelling umarga to mumbai arrested by vadgav maval police | corona virus : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात

corona virus : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात

Next
ठळक मुद्देचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; तीन पुरूष, चार महिला व अल्पवयीन नऊ मुले असे एकूण सोळा प्रवासी

वडगाव मावळ : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगा येथून मुंबई येथे वाहनाने जाणाऱ्या १६ जणांना वडगाव पोलिसांनी पकडले.  यामध्ये तीन पुरूष, चार महिला व अल्पवयीन असलेली नऊ मुले असे एकूण सोळा प्रवाशांचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता सर्वांच्या हातावर होमक्वारंटाईनचे शिक्के होते. त्यांना वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये पोलिस बंदोबस्तात होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु,कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूमगाव येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास या सोळा जणांनी नाकाबंदी असताना कसा केला हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 
मैनुद्दीन शरमुद्दीन शेख वय २९ रा.गौतमनगर, अंधेरी )असे गुन्हा दाखल केलेल्या चालकाचे नाव आहे 
पोलिस निरीक्षकसुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे वडगाव तळेगाव फाट्यावर नाकाबंदी करण्यात आली.तपासणी करताना कार  (एमएच ०२ सीआर ८८१०) यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले आढळले. यामध्ये तीन पुरूष, चार महिला व अल्पवयीन असलेली नऊ मुले असे एकूण सोळा प्रवाशांचा समावेश होता. यांची तपासणी केली असतात सर्वांच्या हातावर होमक्वारंटाईन शिक्के होते. हे सर्वजन २२ मार्च पासून मुरूमगाव येथे वास्तव्यास होते.त्यांची तेथील शासकीय रूग्णालयात तपासणी करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांची तळेगाव येथील जनरल हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय करून त्यांना वडगाव येथे ठेवण्यात आले. होम क्वारंटाईन असल्याने त्यांनी तिथेच राहणे आवश्यक असताना ते मुंबईला चालले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

.....

नाकाबंदीत ४०० किलोमीटर प्रवास केला कसा... 
या प्रकरणी माहिती मिळताच आमदार सुनिल शेळके घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाई व संबंधित प्रवाशांची माहिती घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक यांच्याशी संपर्क साधून या गंभीर प्रकाराची माहिती दिली. कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूमगाव येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास नाकाबंदी असताना कसा केला. असा सवाल शेळके यांनी केला असून नाकाबंदी अजून कडक करावी अशी मागणी केली. 

..............................

वडगावमध्ये घबराट....
त्या सोळा जणांना वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये ठेवले असल्याने वडगाव मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर त्यांना अन्यजागी हालवा अशी मागणी युवकांनी केली आहे. 

Web Title: corona virus : Home quarantine people who travelling umarga to mumbai arrested by vadgav maval police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.