शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Corona virus : पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'चे काम जलदगतीने पूर्ण करा: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 16:52 IST

कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजन बेडची क्षमता वाढवण्याची सूचना

ठळक मुद्देपुणे व पिंपरीतील जम्बो रुग्णालय निर्मितीच्या कामाची पाहणी

पिंपरी : राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. याची पाहणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. त्यावेळी ‘कोविड सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे. पावसाचे पाणी साचणार नाही. याची दक्षता घ्यावी, आॅक्सिजन बेडची क्षमता वाढवा, अशा सूचना केल्या. कामाचा आढावा घेतला.

पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यानुसार  राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न  करत आहे. वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये नव्याने एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी येणारा पन्नास टक्के निधी राज्य सरकार आणि पन्नास टक्के निधी  पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणार आहे. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयमच्या कोवीड सेंटर कामाची पाहणी पवार यांनी पाहणी सकाळी केली. विभागीय आयुक्त सौरभ राव , जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे,  मनसेचे गटनेते सचिन चिखले, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, समीर मासूळकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिसरात फिरून रूग्णालय कसे उभारले जाणार आहे, याची माहिती घेतली. तसेच आयसीयू बेडची उभारणी करताना त्यांची उंची किती असावी, कोणत्या प्रकारचे साहित्य वापरण्यात येणार आहे. याबाबतचीही माहिती घेतली. सूचनाही केल्या. रूग्णवाढीचा आढावाही घेतला.अजित पवार म्हणाले, ‘‘प्रशासनाने कोवीड केअर सेंटरचे काम जलदगतीने  पूर्ण करावे. आॅक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात यावी. काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे का, काम चांगले करा. पावसाचे पाणी साचणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. आॅक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात यावी.’’

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलAjit Pawarअजित पवारshravan hardikarश्रावण हर्डिकरcommissionerआयुक्त