शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पिंपरी-चिंंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:45 IST

चाकण वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या संतोष झेंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता...

ठळक मुद्देझेंडे यांनी पुणे शहर, पुणे वाहतूक विभाग, पिंपरी, एमआयडीसी भोसरी येथे बजावली सेवा

पिंपरी : लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात एकाही पोलिसाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नव्हता. १५ मे रोजी शहर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला. शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष झेंडे यांचे कोरोनामुळे रविवारी (दि. ३०) निधन झाले. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. संतोष झेंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.  त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. संतोष झेंडे सुरुवातीला मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी पुणे शहर, पुणे वाहतूक विभाग, पिंपरी, एमआयडीसी भोसरी येथे सेवा बजावली. शहर पोलीस दलातील ३२ अधिकारी आणि २२२० पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या नऊ अधिकारी व ६० कर्मचारी उपचार घेत आहेत. तसेच बाहेरून पिंपरी-चिंचवड शहरात बंदोबस्तासाठी आलेले १० कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून कोरोना सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेलकडून कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यात येते. त्यामुळे पूर्वीच्या गंभीर व्याधी व आजार असलेल्या पोलिसांनी कोरोनावर सहज मात केल्याचे दिसून येते. मात्र, झेंडे यांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू