शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Corona virus : पुणे महापालिकेने भरले ३७०० रुग्णांचे पंधरा कोटींचे बिल; खासगी रुग्णालयांसोबत करार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 6:59 PM

कोरोनावरील उपचारांसाठी शासकीय योजनांचा झाला लाभ

ठळक मुद्देआणखी शेकडो रुग्णांची बिले आली पालिकेकडे ; प्रक्रिया सुरु

पुणे : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या तब्बल ३७०० रुग्णांचे बिल महापालिकेने भरले आहे. तब्बल १४ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल पालिकेने विविध रुग्णालयांना अदा केले आहे. आणखी शेकडो रुग्णांची बिले पालिकेकडे आलेली असून त्याचीही प्रक्रिया सुरु आहे.

 शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला असून नवे रुग्ण घटत चालले आहेत. बरे होणा-यांचे प्रमाण ९० टक्क्याच्या पुढे गेले आहे. महापालिकेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. फैलाव रोखण्यासोबतच रुग्णांवर उपचारांसाठीही  विशेष प्रयत्न केले जात आहेत. पालिकेचे कोरोना उपचारांकरिता करार केलेल्या रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार उपचार केले जात आहेत.

 बाधित आणि संशयीत रुग्णांना पालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना या खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास एक लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. यासोबतच शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट योजनांचाही लाभ दिला जात आहे. यासोबतच जे नागरीक या योजनांसाठी पात्र ठरत नाहीत तसेच ज्यांच्याकडे पिवळे-केशरी शिधापत्रिका आहेत अशा रुग्णांनी पालिकेने करार केलेल्या १० खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्या बिलांची रक्कम महापालिका सीएचएस दराने अदा करीतआहे. ==== महापालिकेने खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेतलेल्या ३७००  रुग्णांची आजवरच्या उपचारांची १४ कोटी ८१ लाख रुपयांची बिले विविध रुग्णालयांना अदा केली आहेत. आणखीही बिले पालिकेला प्राप्त झालेली असून त्याचीही प्रक्रिया सुरु आहे. - डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल