Corona virus : बारामतीत सापडला आठवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 04:47 PM2020-04-24T16:47:20+5:302020-04-24T16:47:35+5:30

ग्रामीण भागात पहिलाच रुग्ण सापडल्याने चिंता वाढली.

Corona virus: Eighth corona positive patient found in Baramati | Corona virus : बारामतीत सापडला आठवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Corona virus : बारामतीत सापडला आठवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे शहरात उपचार सुरु असल्याची माहिती

बारामती : बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रथमच कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडला आहे. त्याचा तपासणी अहवाल ' पॉझिटिव्ह ' आल्याचे स्पष्ट झाले आहे . तालुक्यातील माळेगांव येथील हा रुग्ण असुन ग्रामीण भागातील पहिला तर, बारामती परीसरातील हा आठवा रुग्ण आहे. त्याच्यावर पुणे शहरात उपचार सुरु असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनीदिली.
शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरात आजपर्यंत एकुण सात रुग्ण सापडले आहेत.त्यापैकी भाजी विकेता असणाऱ्या रुग्णाचा मृत्यु झाला आहे.तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची बातमी धडकली,तोच हा रुग्ण सापडल्याचा अहवाल पुढे आला आहे.त्यामुळे बारामतीकरांच्या दिलासा काळजीमध्ये बदलला आहे..आज सापडलेला रुग्ण लकडेनगर माळेगाव बु.येथील आहे. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिला रुग्ण आहे. त्यामुळे ग्रामीण भागातअनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही .कोणीच बाहेर फिरू नये घरात राहावे,अशी सुचना प्रशासनाच्या वतीने करण्यात  आली आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता लकडेनगर माळेगाव बु हे केंद्र धरुन ५ किमी परिसर बफर झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे. त्या क्षेत्रात सर्वप्रकारची वाहतुक नियंत्रित करणेत आली आहे. अत्यावश्यक सेवा यांना यातुन वगळले असुन झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करणेत आली आहे. तेथुन सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत तातडीने सर्व्हे सुरु करण्यात आला आहे.
—————————————
...निगेटीव्ह अहवाल आलेल्या त्या कुटुंबियांचे जोरदार स्वागत 
गुरुवारी(दि २३) बारामती शहरातील एकाच कुटुंबातील चौघाजणांचा अहवालनिगेटीव्ह आला. अहवाल निगेटीव्ह आलेल्या  कोरोना बाधित कुटुंबियांचे भागातील स्थानिक नगरसेविका ,उपनगराध्यक्षा  तरन्नुम अल्ताफ सय्यद यांनीजोरदार स्वागत केले. फटाके वाजवत व फुलांची वूष्टी करत  स्वागत करण्यातआले. यावेळी या कुटुंबियांच्या चेहºयावर देखील  आनंद ओसंडून वाहत होतायावेळी मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद स्वयंसेवक  गणेश कदम नितीनभागवत ओंकार राऊत योगेश गायकवाड मेहबूब सय्यद इत्यादी उपस्थित होते.
————————————————

Web Title: Corona virus: Eighth corona positive patient found in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.