शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

Corona virus : व्हेंटिलेटर वाढले तरी ‘वेटिंग’ कायम, ५०० रुग्ण आयसीयुमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 11:19 IST

प्रशासन पुरेशा आयसीयु बेड उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपासून दैनंदिन रुग्ण वाढ दीड हजारांच्या घरात

पुणे : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यानुसार मागील दहा दिवसांत जवळपास ९० व्हेंटिलेटर उपलब्धही झाले. पण गुरूवारी दुपारी एकही व्हेंटिलेटर रिकामा नव्हता. व्हेंटिलेटरची संख्या वाढूनही रुग्णांना वेटिंगवरच राहावे लागत आहे. व्हेंटिलेटर नसलेल्या आयसीयु बेडमध्येही ७३ ने वाढ झाली असली तरी केवळ १२ बेड रिकाम्या होत्या. त्यामुळे प्रशासन पुरेशा आयसीयु बेड उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याची स्थिती आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच वेगाने वाढ होऊ लागली आहे. काही दिवसांपासून दैनंदिन आकडा दीड हजाराच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात बेड मिळणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने दि. १४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या कालावधीत आयसीयु, आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीच स्पष्ट केले होते. त्यानुसार मागील दहा दिवसांत यामध्ये वाढही झाली. पण प्रत्यक्षात वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत नव्याने वाढलेल्या बेड कमी पडू लागले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार, लॉकडाऊन लागु होण्याच्या आदल्या दिवशी (दि. १३ जुलै) डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) मध्ये एकुण ३००५ बेड उपलब्ध होत्या. त्यामध्ये आॅक्सिजनसहित १६३५, व्हेंटिलेटररहित आयसीयु १४० आणि २१० व्हेंटिलेटरसहित बेड होत्या. यापैकी अनुक्रमे २००, २ व ३ बेड रिकाम्या होत्या. या स्थितीमध्ये मागील दहा दिवसांत फारसा फरक पडलेला दिसत नाही. आॅक्सिजन व आयसीयुची संख्या वाढली असली तरी रुग्णही त्याचप्रमाणात वाढल्याने अपेक्षित बेड रिकाम्या राहत नाहीत. दि. २३ जुलै रोजी दुपारपर्यंत शहरात विविध रुग्णालयांमध्ये एकुण ५१४ आयसीयु बेड होत्या. त्यामध्ये ३०१ व्हेंटिलेटर बेडचा समावेश होता. या सर्व बेड फुल्ल झाल्याचे दिसून आले. अन्य आयसीयु बेडही केवळ १२ रिकामे होते. दहा दिवसांमध्ये एकुण आयसीयु बेडमध्ये १६४ ने तर व्हेंटिलेटरमध्ये ९१ ने वाढ झाली असली ते अपुरे पडू लागले आहेत. -------------------------शहरातील रुग्णालयातील आॅक्सिजन व आयसीयु बेडची स्थिती(स्त्रोत - विभागीय आयुक्त कार्यालय डॅशबोर्ड)                     दि. २३ जुलै                                   दि. १३जुलै                              एकुण   उपलब्ध                      ए.       उ.          आॅक्सिजनरहित         १२०२    ३९८                    १०२०    १७०आॅक्सिजनसहित       २०२८     १८९                   १६३५     २००व्हेंटिलेटररहित आयसीयु २१३    १२                         १४०     २व्हेंटिलेटरसहित आयसीयु ३०१ ००                        २१०      ३------------------------------------------------------गंभीर रुग्णांमध्ये वाढ (स्त्रोत - आरोग्य विभाग, महापालिका)दिवस गंभीर रुग्ण१ जुलै ३४७१३ जुलै ४८६१५ जुलै ५०२१९ जुलै ५५७२२ जुलै ६०९---------------------शहरातील काही मोठ्या रुग्णालयांतील गुरूवारी दुपारपर्यंत बेडची स्थिती (कंसात उपलब्ध)रुग्णालय      आॅक्सिजन    आयसीयु (व्हेंटि.रहित)    व्हेंटिलेटरससून            १८१ (१३)     ००                            ६७ (०)भारती            १२० (०)      १७ (०)                      १३ (०)दीनानाथ         २८० (०)      १० (०)                     ३० (०)सिम्बायोसिस   ६० (३७)       १९ (०)                   ११ (०)बुधराणी           ७४ (३)        १६ (३)                   १७ (०)केईएम।           १०९ (५)         ००                      ११ (०)नोबल ।।          १७० (१)      १० (०)                   १४ (०)पुना।             ७५ (१५)           ४ (०)                   ११ (०)रुबी।           ८० (५)             २० (०)                   २० (०)----------------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यNavalkishor Ramनवलकिशोर राम