Corona virus : पुणे विभागात सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:11 PM2020-06-24T17:11:02+5:302020-06-24T17:11:41+5:30

सोलापूरच्या वाढत्या मृत्युदराबाबत चिंता ; पुणे जिल्ह्याची स्थिती जैसे थे 

Corona virus : Corona situation under control in Satara, Sangli and Kolhapur in Pune division | Corona virus : पुणे विभागात सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात

Corona virus : पुणे विभागात सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात

Next
ठळक मुद्देआजपर्यंत पुणे विभागात 1 लाख 40 हजार 575 नमुने तपासणी

पुणे : पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असली तरी , सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढता मृत्यूदर प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पुणे जिल्ह्यात मात्र अद्याप ही परिस्थिती गंभीर आहे. 

पुणे विभागातील १२ हजार ६३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २० हजार ४१६ झाली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ६ हजार ९०९ आहे. विभागात कोरोनाबाधित एकुण ८६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४६७ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६१.९१ टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण ४.२५ टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील १६ हजार ३८५ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित ९ हजार ७९१ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५ हजार ९८६ आहे. कोरोनाबाधित एकूण ६०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३५५ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण ५९.७६ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ३.७१ टक्के इतके आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत ८४४ रुग्ण असून ६६८ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १३७ संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील २ हजार १५४ कोरोना बाधीत रुग्ण असून १ हजार ३१० बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ६४० संख्या आहे. कोरोना बाधित एकूण २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधित २९१ रुग्ण असून १८६ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ९६ आहे. कोरोना बाधित एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील ७४२ कोरोना बाधीत रुग्ण असून ६८४ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५० आहे. कोरोना बाधित एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण १ लाख ४० हजार ५७५ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी १ लाख ३८ हजार ८८९ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर १ हजार ६८६ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १ लाख १८ हजार १४८ नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून २० हजार ४१६ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Web Title: Corona virus : Corona situation under control in Satara, Sangli and Kolhapur in Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.