शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

Corona virus : विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच सहकार्य अपेक्षित, अन्यथा...; अजित पवारांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 9:14 PM

पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीवरुन होत असलेल्या टीकेसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. ते आम्ही केले. आम्हालाही अनेकदा वाटतं की आत्ता निवडणुका लागायला नको होत्या.

पुणे - राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक मत मांडले. पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीवरुन होत असलेल्या टीकेसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. ते आम्ही केले. आम्हालाही अनेकदा वाटतं की आत्ता निवडणुका लागायला नको होत्या. थोड्या उशिरा किंवा कोरोना कमी झाल्यानंतर झाल्या असत्या तरी चाललं असतं, असेही अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झालं तर आम्ही जबाबदार असणार आहोत. कारण निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत. आम्ही उमेदवार उभा केला म्हटल्यावर प्रचार तर करणारच आहे. निवडणुका लावल्यावर घरातून तर प्रचार होऊ शकत नाही, असे रोखठोक मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच, कडक निर्बंधासंदर्भातही नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. 

राज्यात यंत्रणा कोलमडून पडलेली आहे. नियमांचे पालन नाही केले तर कोरोना होतो. ॲान-बेड मिळाला नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचल्या. याबद्दलचा प्रयत्न करणं सरकारचं काम आहे. मात्र, सद्य परिस्थितीत तुम्हाला जरी मुख्यमंत्री केलं तरी काही करता येणार नाही, असे पत्रकारांना उद्देशून अजित पवार म्हणाले. तसेच, कोणाचा जीव जावा असं कोणाला वाटतं का? राज्यात शेतकरी आत्महत्या होवू नये म्हणूनही प्रयत्न करत होतो. आता, राज्यात कोरोना बाधितांचे जीव वाचले पाहिजेत. तसेच, कोणी कोरोनाबाधित होवू नये यासाठीचा हा कडक निर्बंध आणि प्रयत्न सुरू असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

विकेंड लॉकडाऊनला म्हणजेच शनिवार आणि रविवारी नागरिकांनी पूर्ण प्रतिसाद दिला, त्याचे अजित पवार यांनी कौतुक केले. मागच्या लॅाकडाउनला खूप अडचणींचा सामना करावा लागला. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, त्याला प्रतिसाद दिला नाही. तर, संपूर्ण लॅाकडाऊन लावावा लागेल, असा इशारीही अजित पवार यांनी दिला आहे.  पंढरपूर आणि मंगळवेढा येथील पोटनिवडणुक होत आहे. तिथे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. याच, दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे महाविकास आघाडी सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा असे वक्तव्य केले होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ''महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे"अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, मी राजकीय बोलत नाही. केंद्राने व्हॅक्सीन एक्सपोर्ट करायची गरज नव्हती. रेमडेसिविर निर्यातीची गरज नव्हती. पण असं म्हणलं की मी राजकीय बोलतो अशी टिका करणार असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

ससूनमधील निवासी डॉक्टरांच्या संपावर भाष्य करताना अजित पवार  म्हणाले, ससूनच्या निवासी डॉक्टरांनो सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. तुमचे रास्त मुद्दे नक्की ऐकून घेऊ, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर काही कडक पावलं उचलावी लागतील. ससूनमधील निवासी डॉक्टरांनी परिस्थितीची भान ठेवून टोकाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची मानसिकता ठेवावी. तसेच कोण पक्ष काय म्हणतो याला महत्व नसतं. तर शहराच्या हिताचे काय हे पाहुन निर्णय घेतो असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या