शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

Corona virus : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहनचालकांचे प्रबोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 13:04 IST

मास्क वापरण्याचे फायदे दिले समजावून

पुणे : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.पुण्यातला हा आकडा २२ वर पोहचला आहे. त्यामुळे सरकार व जिल्हा प्रशासन पातळीवर विविघ पावले उचलली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेने अनेक जाहिरातींद्वारे कोरोनाविषयी जनजागृती सुरु केली आहे. या  मोहिमेत पुणेपोलिसांकडून वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात पुढाकार घेण्यात येत आहे. नागरिकांचे प्रबोधन करत मास्क वापरण्याचा आग्रह धरत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  गरज असेल तरच बाहेर पडावे असे पुणे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरुण पिढीने या सुट्टीचा गैरफायदा घेत सुट्टीचा आनंद घेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांनी गरजेपुरतेच घराबाहेर पडणे गरजेचे आहे मात्र ठीक ठिकाणी तरुण मुले एकत्र येऊन गर्दी करून गप्पा मारत वेळ घालवत बसलेले दिसत आहेत. यामुळे तरुणाईचे या घातक कारोना व्हायरस कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून जनजागृती करणे आवश्यक आहे ही बाब नागरिकांना पोलीस देखील समजावून सांगत आहेत.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त बोराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळेगावे, हेड कॉन्स्टेबल मुथय्या, अजय गायकवाड आदी उपस्थित होते. तसेच औंध चौकी मधील पोलीस कर्मचारी उपस्थित होते औंध येथील मेडिपॉइंट हॉस्पिटल चौक येथे पोलिसांच्या वतीने मास्क न वापरणाºया नागरिकांचे प्रबोधन करून मास्क वापरण्याचे फायदे सांगण्यात येत होते. प्रशासनाने शाळा, कॉलेजेस तसेच विविध ठिकाणचे कार्यालय बंद ठेवून नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे . चतु:र्श्रुंगी पोलिसांतर्फे वाहनधारकांना करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी प्रबोधन करताना दिसत आहे. पोलिसांतर्फे वाहने अडवून नागरिकांना या व्हायरसची माहिती देऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी