शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

Corona virus : पुणे शहरातील स्वच्छतागृहांची दिवसातून चारवेळा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 23:00 IST

सर्वाधिक बाधित भागांमध्ये शहरातील एकूण स्वच्छतागृहांपैकी ५३ टक्के स्वच्छतागृहे आहेत

ठळक मुद्देस्वच्छतागृहांचे क्लिनिंग सुरु : लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रमाण असल्याचा पालिकेचा दावागेल्या पाच वर्षात नवीन स्वच्छतागृहं वाढली नसल्याचेही समोर स्वच्छतागृहांचा वापर कोरोनाग्रस्त व्यक्तीने केल्यास त्याचा संसर्ग अन्य नागरिकांना होण्याची शक्यता

पुणे : शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मध्यवस्तीतील दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टी बहूल भागातील आहेत. या भागातील स्वच्छतागृहांची दिवसातून चार वेळा स्वच्छता केली जात असून निर्जंतुकीकरणही केले जात आहे. झोपडपट्ट्या, चाळी आणि दाटीवाटीच्या भागामध्ये स्वच्छतागृहांमधून कोरोनाची लागण होत असल्याचे केंद्रिय सचिवांनी कळविल्यानंतर याविषयाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले. सर्वाधिक बाधित भागांमध्ये शहरातील एकूण स्वच्छतागृहांपैकी ५३ टक्के स्वच्छतागृहे आहेत. गेल्या पाच वर्षात नवीन स्वच्छतागृहं वाढली नसल्याचेही समोर आले आहे.केंद्रिय सचिवांनी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून सार्वजनिक स्वच्छतागृहांमधून कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून त्यापुर्वीच परिपत्रक निर्गमित करुन स्वच्छता गृहांच्या स्वच्छते संदर्भात सूचना दिल्या होत्या. शहरातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, शिवाजीनगर-घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता, कसबा विश्रामबाग आणि येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्याच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये राहण्यास आहे.

झोपडपट्ट्या आणि चाळींसह काही प्रमाणात वाड्यांमध्ये आजही सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केला जातो. एका वस्तीमध्ये अंदाजे दोन ते पाच हजार नागरिक राहण्यास आहेत. वसाहतींमध्ये तीन ते पाच स्वच्छतागृहे बांधलेली असतात. काही ठिकाणी दुमजली स्वच्छतागृहे सुद्धा आहेत. महिला-पुरुषांकरिता वेगवेगळ्या असलेल्या या स्वच्छतागृहांचा वापर नागरिकांकडून केला जात असताना स्वच्छता राखली जात नाही. स्वच्छतागृहामध्ये गेल्यानंतर पान, तंबाखू अथवा गुटखा खाऊन थुंकणे, बेडके टाकणे, पाण्याचा पुरेसा वापर न करणे, दारुच्या वाटल्या, विटांचे तुकडे भाड्यांमध्ये टाकणे असे प्रकार घडतात. त्यामुळे वारंवार संडास तुंबण्याचे प्रकारही घडतात. या स्वच्छतागृहांचा वापर एखाद्या कोरोनाग्रस्त व्यक्तीने केल्यास त्याचा संसर्ग अन्य नागरिकांना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या भागात खबरदारी घेण्यात येत आहे.=====

गेल्या पाच वर्षात नवे स्वच्छतागृह नाही....मध्यवस्तीतील भागात गेल्या पाच वर्षात नवीन स्वच्छतागृह उभारण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतू, वसाहतींमधील लोकसंख्येच्या प्रमाणात पाहता ९५ टक्क्यांपर्यंत स्वच्छतागृह उपलब्ध असल्याचे घनकचरा व्यवस्थापन वि•ाागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.

====== 

गेल्या काही वर्षात नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून घेण्यावर भर दिला आहे. मध्यवस्तीतील वसाहतींमध्येही हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

======स्वच्छतागृहांची आकडेवारीप्रकार               स्वच्छतागृहे              संडास कक्ष                  वैयक्तिक स्वच्छतागृहेशहर                  १,४४४                        १४,०००                             ४६,५००मध्यवस्ती         ७४२                            ७,३००                              २४, ००० 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका