शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Corona virus : पुणे शहरात विनामास्क बहाद्दारांवर कारवाई करणाऱ्या दोन पोलिसांवर हल्ला,चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 15:15 IST

विना मास्क असणार्‍यांवर शहरात जोरदार कारवाई

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी केली चौघांना अटक

पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु आहे. त्याचवेळी दोन ठिकाणी कारवाई करताना पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे़ कोरेगाव पार्क व सातारा रोडवरील पुष्प मंगल चौकात हे प्रकार घडले.शहरासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ शहरात जागोजागी पोलिसांकडून कारवाई होत आहे.याबाबत पोलीस हवालदार जयवंत देवीदास भालेराव (वय ५२) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी इलियास हासीम आतिया (वय ५५), हासिम इलियास आतिया (वय २३, दोघे रा़ अवधुत अपार्टमेंट, टिंगरेनगर) यांना अटक केली आहे. भालेराव हे बंडगार्डन वाहतूक विभागात कार्यरत असून ते सेंट मिरा बसस्टॉपजवळ सोमवारी सायंकाळी कारवाई करीत होते. त्यावेळी मोटारसायकल वरुन जाणाºया मुलीने मास्क घातला नसल्याचे पाहून त्यांनी थांबण्याचा इशारा केल्यावरही चालक न थांबल्याने त्यांनी पाठलाग करुन त्यांना थांबविले. त्यावेळी इलियास याने त्यांच्या कानाखाली मारली तर, मुलीने शिवीगाळ करुन त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.दुसर्‍या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक छाया गादिलवाड यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन ऋषीकेश हनुमंत राऊत (वय ३५, रा़ भाग्यश्री गार्डन सोसायटी, धनकवडी) आणि शौनक अनिल पानसे (वय ३९, रा़ पदमदर्शन सोसायटी, सहकारनगर) यांना अटक केली आहे. गादिलवाड या सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सातारा रोडवरील पुष्प मंगल चौकात पोलीस शिपाई फुंदे व चव्हाण यांच्यासमवेत कर्तव्यावर होत्या़ यावेळी ते विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत होते़ ऋषीकेश व शौनक हे विनामास्क फिरत असल्याने त्यांना अडवून कारवाई करती असताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला तसेच स्वत:चे मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग केले.शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांकडून अजूनही ते गांभीर्याने घ्यावेसे वाटत नाही़. त्यावर कारवाई करु लागल्यास पोलिसांना मारहाण सहन करावी लागत आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी