शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात ८ पोलिसांना कोरोनाची लागण; शंभरहून अधिक कर्मचारी क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 19:32 IST

जे कर्मचारी कोरोना बाधित झाले. ते प्रामुख्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीत ड्युटीला नव्हते..

ठळक मुद्देआमचीही कोरोना चाचणी करा : शेजारच्या पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची मागणी

पुणे : शहराच्या मध्य वस्तीतील एका पोलीस ठाण्यातील ८ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेले पोलीस ठाण्यातील जवळपास सर्व कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आले. त्याचवेळी या पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी या प्रकारामुळे घाबरुन गेले असून त्यांनी आमची करोना चाचणी करावी, अशी मागणी आहे. प्रसंगी चाचणीचा खर्च करण्याची तयारीही दर्शविली आहे. या पोलीस ठाण्यातील शंभराहून अधिक कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिसंक्रमित भाग येत असल्याने इतर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच मुख्यालयातील जादा कुमक या पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. त्याद्वारे नाकाबंदी व पेट्रोलिंग सुरु ठेवण्यात आले आहे. सर्व पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. या पोलीस ठाण्यात जे कर्मचारी कोरोना बाधित झाले. ते प्रामुख्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीत ड्युटीला नव्हते. त्यामुळे ते नियुक्तीला असलेल्या पोलीस चौक्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या या पोलीस ठाण्यातील कामकाज दुसर्‍या मजल्यावरुन चालविले जात आहे. त्यामुळे या इमारतीत काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यानी घाबरुन जाऊ  नये, मात्र, त्याचवेळी आवश्यक ती खबरदारी जरुर घ्यावी. या पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना क्वारंटाईन केले असले तरी ते फोनद्वारे संपर्कात असून आवश्यक त्या मदत ते करत आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस