Corona virus: 774 patients cured in Pune in a day; A total of 329 patients were added | Corona virus : पुण्यात दिवसभरात ७७४ कोरोना रुग्ण झाले बरे; एकूण ३२९ रुग्ण वाढले 

Corona virus : पुण्यात दिवसभरात ७७४ कोरोना रुग्ण झाले बरे; एकूण ३२९ रुग्ण वाढले 

ठळक मुद्देविविध रुग्णालयातील ६८५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३२९ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ७७४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ६८५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ८८५ झाली आहे.  

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६८५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३६६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३१९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार ७७८ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात १९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील ४ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार १०५ झाली आहे. दिवसभरात एकूण ७७४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ४८ हजार ४१६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार ४०६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ६ हजार ८८५ झाली आहे. 
 -------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ८८३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७ लाख १९ हजार ८६९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus: 774 patients cured in Pune in a day; A total of 329 patients were added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.