Corona virus : 7 new patients are infected with corona virus in a day In Khed taluka, The number of patients in the taluka is 15 | Corona virus : खेड तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ७ रुग्ण कोरोनाग्रस्त, तालुक्यातील रुग्णांची संख्या १५ वर

Corona virus : खेड तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ७ रुग्ण कोरोनाग्रस्त, तालुक्यातील रुग्णांची संख्या १५ वर

ठळक मुद्देकोरोनाचा पादुर्भाव राजगुरूनगर शहर व ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

राजगुरुनगर...खेड तालुक्यात मंगळवारी ७ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहे.तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १५ वरती पोहचली आहे. कोरोनाचा पादुर्भाव राजगुरूनगर शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
चास येथील पापळवाडी येथे काही दिवसापुर्वी मुंबईहून आलेला व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राक्षेवाडी ५, चाकण १, वडगाव पाटोळे १, पापळवाडी १ असे तालुक्यात कोरोनाग्रस्त आढळून आले होते.. त्याच बरोबर त्यांच्या संर्पकात आलेले तसेच मुंबई येथुन आलेले वडगाव पाटोळे येथील ३ रुग्ण, मुंबईवरून कडुस येथे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले ३ व्यक्ती, तसेच कुरकुंडी यथे ३ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५ झाली आहे. त्यामध्ये एका १० वर्षीय मुलांचा समावेश असल्याचे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले. तसेच चाकण येथील खराबवाडी येथे कंपनीत काम करणारा व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी येथुन खराबवाडी येथे कामास येत होता. तालुक्यात मुंबईवरून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६ नागरिकांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे
.तालुक्यात राक्षेवाडी हा कंटेनमेंट झोन वगळता शहरातील काही उद्योग व्यवसाय वरील निर्बंध उठवण्यात आले आहे. या निर्णयाने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. परंतु नागरिक नियमाचे पालन कमी आणि उल्लंघन जास्त करू लागले आहेत. कंटेन्मेंट झोन नावाला उरला असून इथे प्रत्येकजण निर्धास्तपणे वावरू लागला आहे. राजगुरुनगरकरांना ही धोक्याची घंटा असून कोरोना दारात तरीही माणसं बसेना घरात असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. तालुक्यात कोणाचा पादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसात आठ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज पुन्हा ७ रुग्ण सापडले आहे. त्यामुळे. आरोग्य यंत्रणेची अक्षरश: झोप उडाली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus : 7 new patients are infected with corona virus in a day In Khed taluka, The number of patients in the taluka is 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.