शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Corona virus : पुण्यात नवीन ६९ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : ४ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 11:46 IST

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४४२ 

ठळक मुद्देसाधारणत: दिवसाला १०० ते १५० जणांचे नमूने तपासणीसाठी १६ मार्चपासून सुरू केलेल्या सर्वेक्षणात आत्तापर्यंत २७ लाख ९८ हजार ६५१ जणांची तपासणी

पुणे : लॉकडाऊन व नंतर पुणे शहरातील बहुतांश भाग सील करून कोरोना विषाणूच्या संसर्गाला अटकाव करत असतानाच, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या समोर येऊ लागली आहे़. गुरूवारी पुण्यात आजपर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ६९ नवीन रूग्ण आढळून आले असून, या वाढीमुळे पुणे शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या ४४२ झाली आहे. हा वाढीचा आकडा आणखी काही दिवस असाच राहण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रूग्णांचे सत्रही थांबले नसून, आज नव्याने ४ रूग्णांचा बळी गेला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 47 झाली आहे़.    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या जेथे जास्त आहे अशा सील केलल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे. त्यांना थेट तपासणीसाठी पालिकेने उभारलेल्या केद्रांमध्येच दाखल करण्यात येत असून, त्यांचे स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहेत. साधारणत: दिवसाला १०० ते १५० जणांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. यामुळे अधिकाधिक कोरोनाचे संसर्ग झालेल्या व्यक्ती उजेडात येत आहेत. यामुळे वेळीच त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे ठरत आहे.     बुधवारी आढळून आलेल्या ६५ रूग्णांपैकी नायडू हॉस्पिटलमध्ये ५७, ससून हॉस्पिटलमध्ये ५ व शहरातील इतर खाजगी रूग्णालयांमध्ये ३ रूग्णांची समावेश आहे. सायंकाळी सातपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आज ससून हॉस्पिटलमध्ये पाच कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू झाला असून, यामध्ये दोन पुरूष व तीन महिला रूग्णांचा समावेश आहे. या पाचही जणांना अन्य आजारांने ग्रासलेले होते. आजपर्यंत पुण्यात जे रूग्ण दगावले गेले आहेत. त्यापैकी एकही रूग्ण केवळ कोरोनामुळे गेल्याचे अद्याप तरी आढळून आलेले नाही. तसेच जे रूग्ण दगावले आहेत. त्यांपैकी बहुतांशी जणांचे वय हे ६० च्या पुढेच आहे. १६ मार्चपासून सुरू केलेल्या सर्वेक्षणात आत्तापर्यंत २७ लाख ९८ हजार ६५१ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ . यापैकी १ हजार २६३ जणांना स्रिनिंगसाठी पाठविण्यात आले होते़. आज १४१ व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते़ यापैकी ६९ जण नव्याने कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे़.

......

पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या ५०६पुणे शहर - ४३२पिंपरी चिंचवड - ४५नगरपालिका हद्द - १६ पुणे ग्रामीण -१३एकूण मृत्यू - ४७ 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका