शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : शिरूर येथील रहिवाशी शाळेत ४८ मुली आणि ९ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 20:50 IST

प्रशासन खडबडून जागे; आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांकडून शाळेची पाहणी....

शिरुर : पुणे शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे.जिल्हा प्रशासनाकडून अनेक स्तरावर कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तरीदेखील ग्रामीण भागात नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे गांभीर्याने पालन होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. मात्र, याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शिरूर शहरालगत असणाऱ्या एका रहिवाशी मुलींच्या शाळेतील ४८ मुली व नऊ शिक्षक अशा एकूण ५७ जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली आहे. याबाबत शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, शिरूर शहरालगत असणाऱ्या या शाळेमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती नगरपरिषदेला समजली. या समजलेल्या माहितीनुसार तो रुग्ण आढळल्याने या शाळेतील मुलींची ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातुन अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना झालेल्या मुलींनां शाळेतील एक शिक्षक बाहेर गावाहुन येत असल्याने प्रार्दुभाव झाल्याची माहिती समजली आहे.

शिरूर येथील निवासी शाळेतील मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची व शिक्षकांची शासकीय रुग्णालयामार्फत तपासणी करून औषध उपचार सुरु करण्यात आले आहे. तसेच एका त्रास होत असलेल्या मुलींवर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत .तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवण्याची व्यवस्था केली. शाळेच्या परिसरात नगरपरिषदेच्या वतीने फवारणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली.......

निवासी शाळेतील सर्व मुली व स्टाफ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी एकाची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असून आहे. इतरांना त्या शाळेत क्वारंटाईन केले असून गोळ्या औषधे देणे देण्याचे काम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.तुषार पाटील यांनी सांगितले .

टॅग्स :Shirurशिरुरcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाStudentविद्यार्थीcollectorजिल्हाधिकारीTeacherशिक्षक