Corona virus : पुणे शहरात ४००  नवे कोरोनाबाधित; ३६० रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 12:41 PM2020-11-30T12:41:39+5:302020-11-30T12:42:07+5:30

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९६९ नागरिकांची स्वाब तपासणी..

Corona virus : 400 new corona affected in Pune city; 360 patients were cured | Corona virus : पुणे शहरात ४००  नवे कोरोनाबाधित; ३६० रुग्ण झाले बरे

Corona virus : पुणे शहरात ४००  नवे कोरोनाबाधित; ३६० रुग्ण झाले बरे

googlenewsNext
ठळक मुद्दे१ हजार १९५ रुग्ण ऑक्सिजनवर, ३ मृतांची नोंद

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात ४०० रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४०९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ५४४ झाली आहे.   
     उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४०१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १६४ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार १९५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ४६१ झाली आहे.
 दिवसभरात एकूण ३६० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५९ हजार ७८९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ६९ हजार ७९४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ५४४ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९६९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख १७ हजार १५२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus : 400 new corona affected in Pune city; 360 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.