Corona virus : पुणे शहरात शनिवारी ३९२ रुग्ण झाले बरे, दिवसभरात १६९ ची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 20:28 IST2020-11-07T20:25:47+5:302020-11-07T20:28:19+5:30
पुणे शहरातील प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार १९५ झाली.

Corona virus : पुणे शहरात शनिवारी ३९२ रुग्ण झाले बरे, दिवसभरात १६९ ची वाढ
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात १६९ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३९२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५७६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार १९५ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३९९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २५९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार १५२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात १० मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील २ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ३३१ झाली आहे.
दिवसभरात एकूण ३९२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५३ हजार ५३१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ६३ हजार ५७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार १९५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ४६९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७ लाख ५२ हजार ८८१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.