शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्यात एकाच दिवसांत ३८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, शुक्रवारी ३ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्या २४७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 00:45 IST

पुण्यात शुक्रवारी सुमारे ३६४ नवीन कोरोना संशयित व्यक्तींना विविध रूग्णालयांत दाखल करून घेण्यात आले.

ठळक मुद्देकोरोनाचा धोका अजून टळला नसल्याचा इशारा बळींची संख्या आता पोहचली अठ्ठावीसवर

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढ आहे. ३ एप्रिलपासून नित्याने दहा-वीस रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु, गुरुवारी ही संख्या १२ वर आली होती.त्यामुळे वाढ आटोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. परंतु, कोरोनाचा धोका अजून टळला नसल्याचा इशारा शुक्रवारी (दि.10 )मिळाला. एकाच दिवसात तब्बल ३८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २४७ वर जाऊन पोहचली आहे. तसेच शुक्रवारी पुण्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही बळींची संख्या आता अठ्ठावीसवर पोहचली आहे. पुण्यात शुक्रवारी सुमारे ३६४ नवीन कोरोना संशयित व्यक्तींना विविध रूग्णालयांत दाखल करून घेण्यात आले. या सर्व रूग्णांचे स्वॅब एनआयव्हीला पाठविण्यात आले. त्यापैकी ३८ व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा शुक्रवारी 28 वर पोहचला आहे. श्रीरामपूर येथील एका रुग्णासह भवानी पेठेतील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मृत्यू ससून रुग्णालयात झाले आहेत.

त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. गुरूवारी एक पुरूष आणि एक महिला असे रूग्ण वाढले होते. त्यानंतर चोविस तासातच शुक्रवारी सायंकाळपर्यंत आणखी तीन रूग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी  ३३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज मिळाले आहेत. त्यात तीन जणांचा समावेश आहे. मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती असून त्यात एक महिला, पुरूष आणि त्यांची छोटी मुलगीचा समावेश आहे-----पुण्यात आता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या: २४७पुणे शहर: २०७पिंपरी चिंचवड: २८नगरपालिका हद्द : ७पुणे ग्रामीण : ५एकूण मृत्यु : २५

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल