Corona virus : पुणे शहरात मंगळवारी ३५७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त; १८५ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 20:30 IST2020-11-10T20:30:12+5:302020-11-10T20:30:30+5:30
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ५८ हजार ७२३ जणांची कोरोना तपासणी

Corona virus : पुणे शहरात मंगळवारी ३५७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त; १८५ नवे रुग्ण
पुणे : शहरात मंगळवारीही कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक असून, आज दिवसभरात ३५७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत तर नव्याने १८५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३७८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २३९ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार ७० जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ जण पुण्याबाहेरील आहेत.
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ५८ हजार ७२३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे़ यापैकी १ लाख ६३ हजार ६१९ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५४ हजार ४८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत ४ हजार ३५२ जणांचा मृत्यू झाला आहे.