शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 21:22 IST

तब्बल १५० रुग्ण अत्यवस्थ तर १० रूग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देप्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २९४; आजारातून बरे झालेल्यांची संख्या ३ हजार २६४

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये ३१८ रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ८५१ झाली आहे. रुग्ण संख्या वाढली असली तरी बरे झालेल्या २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २९४ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १५० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरुवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ३१८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २३६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ७१ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १०१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात गुरूवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २९३ झाली आहे. दिवसभरात एकूण २०५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १५७ रुग्ण, ससूनमधील ०७ तर  खासगी रुग्णालयांमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार २६४ झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर पोचले आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार २९५ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३१५ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४६ हजार ५८२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५७६, ससून रुग्णालयात १४४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५७४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामMayorमहापौरhospitalहॉस्पिटल