शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

Corona virus : पुणे शहरात बुधवारी दिवसभरात ३०२ तर पिंपरीत १३८ जणांना कोरोना संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 21:33 IST

पुणे शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ९५२ झाली आहे.  

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बुधवारी दिवसभरात ३०२ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २९३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ९५२  झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७४ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. यातील २२२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १५२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८०५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५५६ झाली आहे. पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

दिवसभरात एकूण २९३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार २४६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ७५४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ९५२ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६९९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ७२ हजार २७८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.......... औद्योगिकनगरीतील १३८ जणांना कोरोना संसर्ग पिंपरी : औद्योगिकनगरीतील विविध भागातील १३८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून १११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर २ हजार ७६३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.  रुग्णसंख्या दोनशेच्या आत आली आहे. महापालिका परिसरातील रुग्णालयात २ हजार ७९२ जणांना दाखल केले होते. त्यापैैकी २ हजार ३६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १ हजार ९६४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. महापालिका रुग्णालय, जम्बो कोवीड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ७२९ सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आजपर्यंत ९४ हजार ७७७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ........................डिस्चार्ज प्रमाण वाढलेपॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकुण ९१ हजार ४९३ जण बरे होऊन घरी गेले आहेत.  दिवसभरात २ हजार ७९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे........................

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर