शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Corona virus : पुण्यात दर दहा लाखांमागे ३० हजार चाचण्या; राज्य आणि देशाच्या तुलनेत अधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 11:28 PM

पुण्यात सुरुवातीच्या काळात अगदी २०० ते ३०० च्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांची नंतर हजारांच्या पटीत वाढ

ठळक मुद्देआतापर्यंत २ लाख ३३ हजार लोकांचे 'ट्रेसिंग'

पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला. शहरात दर दहा लाख लोकांमागे ३० हजार तपासण्या केल्या जात असून हे प्रमाण राज्य आणि देशात सर्वाधिक आहे. राज्यात पुण्याखालोखाल मुंबईचा क्रमांक लागतो. 

शहरातील कोरोना बधितांचा आकडा २४ हजारांच्या पुढे गेला आहे. तर, आजमितीस साडेआठ हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सुरुवातीच्या काळात अगदी २०० ते ३०० च्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्या नंतर हजारांच्या पटीत वाढविण्यात आल्या. सद्यःस्थितीत दिवसाला साधारणपणे तीन ते साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढल्याचे दिसत आहे. निष्पन्न होणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचारांची व्यवस्थाही केली जात आहे. 

शहरात वाढलेले तपासण्यांचे प्रमाण पाहता रुग्णसंख्या वाढणार हे निश्चित आहे. नुकतेच पालिकेने 'रॅपिड अँटिजेन टेस्ट' किटद्वारे तपासणीला सुरुवात केली आहे. ५ जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात दर दहा लाख लोकांमागे २९ हजार ९८८ तपासण्या केल्या जात आहेत. हे प्रमाण मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या तुलनेत अधिक आहे. मुंबईमध्ये दर दहा लाखांमागे २४ हजार १२३ असे प्रमाण आहे. तर, राज्यात हेच प्रमाण दर दहा लाखांमागे ७ हजार ३७६ आणि देश पातळीवर ५ हजार ९७२ असे आहे. चाचण्यांमुळे रुग्ण लवकर निष्पन्न होण्यास आणि त्यांच्यापासून होणारा संभाव्य प्रसार रोखण्यास मदत मिळत आहे. त्यामुळे प्रशासन अधिकाधिक तपासण्यांवर भर देत आहे. -------- पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत २ लाख ३३ हजार २५४ नागरिकांचे ट्रेसिंग करण्यात आले असून यामध्ये ७३ हजार ३८३ नागरिक 'हाय रिस्क' गटातील आहेत. तर, १ लाख ५९ हजार ८७१ नागरिक 'लो रिस्क' गटातील आहेत. --------- गेल्या चार आठवड्यात वाढलेले स्वाब टेस्टचे प्रमाण आठवडा स्वाब टेस्ट ८-१४ जून-               १२, ७३५ १५-२१ जून             १५, ७५४ २२-२८ जून              २०, ८२४ २९ जून -०५ जुलै      २४, ८१३ ---------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकार