corona virus: 214 new corona virus patients in the pune city and 159 in Pimpri on Monday | corona virus : पुणे शहरात सोमवारी २१४ तर पिंपरीत १५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण 

corona virus : पुणे शहरात सोमवारी २१४ तर पिंपरीत १५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण 

ठळक मुद्देपुणे शहरातील एकूण चाचणीची संख्या ही ७ लाख ३ हजार ६२१ इ

पुणे/पिंपरी : पुणे शहरात सोमवारी केवळ २१४ कोरोनाबाधिताची वाढ झाली आहे.गेल्या चार-पाच महिन्यात प्रथमच कोरोनाबाधितांची एवढी कमी वाढ शहरात दिसून आली आहे. आज दिवसभरात ५०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़. तर दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत.
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवभरात १ हजार ४९७  जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, शहरातील एकूण चाचणीची संख्या ही ७ लाख ३ हजार ६२१ इतकी झाली आहे. 
    शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये सध्या ७९९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४३४ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत़  तर २ हजार १६७  रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.  
    शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ९ हजार १९८ इतकी असून, आत्तापर्यंत १ लाख ४४ हजार ४३२ जण कोरोनामुक्त झालेले आहेत.
----------------------------------
पिंपरीत १५९ नवे कोरोनाबाधित; ४१४ जण कोरोनामुक्त
पिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होत असून शहराच्या विविध भागातील १५९ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ४१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुक्तांची संख्या दुपटीने होऊ लागली आहे. गेल्या वीस दिवसांपासून कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील महापालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये  सध्या १ हजार ७०३  सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या अडीशेपर्यंत खाली आली आहे. शहरात आजपर्यंत ८५ हजार ६७७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
 ...................................
 आठ जणांचा मृत्यू शहरातील ८ आणि पालिका हद्दीबाहेरील ४ अशा १२ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. मृतांमध्ये ज्येष्ठांचा समोवश अधिक आहे. शहरातील ७ पुरूष आणि १ महिला आणि शहराबाहेरील १ पुरूष आणि १ महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.  त्यामुळे शहरातील मृतांची संख्या १ हजार ४८५ वर पोहोचली आहेत. 
.................... 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: corona virus: 214 new corona virus patients in the pune city and 159 in Pimpri on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.