शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

Corona virus : पुण्यात एकाच दिवशी २०८ नवीन कोरोनाबाधित तर १५९ रूग्ण परतले घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 8:41 PM

पुणे शहरात आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ हजार १०७ इतकी

ठळक मुद्देआत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात १ कोटी १४ लाख ६० हजार ४५१ व्यक्तींची माहिती संकलित१६९ रूग्णांची प्रकृती गंभीर तर ४४ जण व्हेंटिलेटरवर

पुणे : शहरात कोविड-१९ह्ण च्या तपासणीचे प्रमाण वाढविल्यापासून अधिकाधिक कोरोना पॉझिटिव्ह (कोव्हिड-१९) रूग्णांची संख्या समोर येत असली तरी, दुसरीकडे शहरातील कोरोनाबाधितांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. गुरूवारी शहरात २०८ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असले तरी, आज तब्बल १५९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजेच १ हजार ७३३ कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालांमध्ये २०८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़ यापैकी महापालिकेच्या नायडू व आयसोलेशन सेंटरमध्ये १४८, ससून हॉस्पिटलमध्ये १३ व खाजगी हॉस्पिटलमध्ये १६९ जणांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये १ हजार ६९८ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून, यापैकी १६९ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे तर ४४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. गुरूवारी सात कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, यापैकी दोन जण ससून हॉस्पिटलमधील तर उर्वरित पाच जण हे खाजगी रूग्णालयात उपचार घेत होते. पुणे शहरात ९ मार्च पासून आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ हजार १०७ इतकी झाली आहे़ यापैकी ४१२ जण ससून हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित ३ हजार ६९५ रूग्ण हे पालिकेच्या नायडू हॉस्पिटल, आयसोलेशन सेंटर व शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यापैकी २ हजार १८२ रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांशी जण हे अन्य आजाराने पहिल्या पासूनच गंभीर होते.कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू लागल्यापासून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापालिका हद्दीतील प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले. या सर्वेक्षणाची सध्या पाचवी फेरी सुरू असून, यामध्ये कोणाला कोरोना आजारासंबंधी लक्षणे आहेत का याची तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ३३ लाख ८७ हजार ९८५ घरी जाऊन १ कोटी १४ लाख ६० हजार ४५१ व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाकरिता महापालिकेच्या ७१२ टिमकडून काम सुरू असून, त्यांनी केलेल्या तपासणीत ४ हजार २१ व्यक्तींना कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्याने क्वारंटाईन करण्यात आले़ तर २ हजार ४७२ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले. आजमितीला १ हजार ६३ कोरोनाबाधित रूग्ण पालिकेच्या नायडू हॉस्पिटलसह अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये, १५३ जण ससून हॉस्पिटलमध्ये तर ४८२ रूग्ण हे शहरातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार  घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामMayorमहापौरhospitalहॉस्पिटल