शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

Corona virus : पुणे विभागात रविवारी १ हजार ७११ नवे रूग्ण; ४० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 22:06 IST

पुणे जिल्ह्यात रविवारी 1 हजार 436 नवीन रुग्ण , एकूण रुग्णसंख्या 36 हजार 964 वर

ठळक मुद्देपुणे जिल्हयात आत्तापर्यंत एकूण १ हजार १७ बाधित रुग्णांचा मृत्यू

पुणे : पुणे विभागात १ हजार ७११ नवे कोरोना बाधित रूग्ण अढळून आले असून विभागातील एकूण रूग्णांची संख्या ४४ हजार ७५ झाली आहे.सध्या विभागात १६ हजार २०९ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत एकूण १ हजार ४४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच विभागातील २६ हजार ४१९ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ५९१ रुग्ण गंभीर आहेत. पुणे विभागातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५९.९४ टक्के तर मृत्यूचे प्रमाण ३.२८ टक्के इतके आहे, असे माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. पुणे विभागात १ हजार ७११ नवे बाधित रूग्ण आढळून आले असून त्यात पुणे जिल्ह्यातील १ हजार ४३६, सातारा जिल्ह्यातील ५१, सोलापूर जिल्ह्यातील १२२, सांगली जिल्ह्यातील २७ तर कोल्हापूर जिल्ह्यातील ७५ रूग्णांचा समावेश आहे.विभागात शनिवारी ४० रूग्णांचा मृत्यू झाला.    पुणे जिल्हयातील ३६ हजार ९६४ बाधीत रुग्ण असून २२ हजार १८० बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या १३ हजार ७६७ असून त्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १० हजार ५, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २ हजार ८३१ व पुणे कॅन्टोंन्मेंट ७७ , खडकी विभागातील ५३, ग्रामीण क्षेत्रातील ७३५, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील ६६ रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात आत्तापर्यंत एकूण १ हजार १७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ८१२, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १०६ व पुणे कॅन्टोंन्मेंट मधील २५, खडकी विभागातील १३, ग्रामीण क्षेत्रातील ४१, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील २० रुग्णांचा समावेश आहे. तसेच ४०२ रुग्ण गंभीर आहेत. जिल्हयामध्ये बरे होणाऱ्य रुग्णांचे प्रमाण ६०.०० टक्के तर मृत्यूचे प्रमाण २ .७५ टक्के इतके आहे.   सातारा जिल्हयात १ हजार ५४३ बाधित रुग्ण असून ९५० बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या साता-यात ५२८ अ‍ॅक्टीव रुग्ण असून एकूण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात २ हजार ८२१ कोरोना बाधित रुग्ण असून २ हजार १९३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात १ हजार ३०१ अ‍ॅक्टीव रुग्ण असून एकूण ३२७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील  ६०८ बाधित रुग्ण असून २९३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.तसेच अ‍ॅक्टीव रुग्ण ३०० असून एकूण १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूर जिल्हयात १ हजार १३९ कोरोना बाधित रुग्ण असून ८०३ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.सध्या जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह ३१३ रूग्ण असून एकूण २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूcommissionerआयुक्तpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड