शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ६२१ कोरोनाबाधितांची वाढ ; ६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 8:58 PM

चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढविले 

पुणे : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत प्रशासकीय यंत्रणा आता घरा-घरापर्यंत पोहचू लागली असून, यात कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना लागलीच कोविड-१९ ची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढले असून, शुक्रवारी तब्बल ६ हजार १४२ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ आज प्राप्त झालेल्या चाचणी अहवालात १ हजार ६२१ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १ हजार २५६ कोरोनाबधित कोरोनामुक्त झाले आहेत़ तर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९४९ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ यापैकी ५२३ जण व्हेंटिलेटरवर, ४२६ जण आयसीयूमध्ये तर ३ हजार ५१९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात  ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहेत.    शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आजपर्यंत १ लाख ३८ हजार ९५१ वर गेली असून, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या १७ हजार ७७३ इतकी आहे़ तसेच आतापर्यंत १ लाख १७ हजार ८८२ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात ३ हजार २९६ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.                ----------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMayorमहापौरcommissionerआयुक्त