शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 11:40 IST

जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी व वेळ प्रसंगी लस न घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिला होता

सुषमा नेहरकर- शिंदेपुणे : कोविड-१९ च्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्नशील आहे; मात्र जिल्ह्यातल्या २ लाख ६९ हजार ३३७ लोकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लोकांना ओमायक्रॉनचा धोका कमी असल्याने लसीकरणावर भर दिला जात असतानाच एकही लस न घेणाऱ्यांची संख्यादेखील खूपच अधिक आहे. यामध्ये सर्वाधिक लोक बारामती, दौंड, इंदापूर, भोर, हवेली, जुन्नर आणि पुरंदर तालुक्यातील लोक आहेत. यामुळेच आता लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (covid 19 vaccination in pune district)

राज्यासह जिल्ह्यात जानेवारी २०२१ महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली; पण सुरुवातीचे सहा महिने लसीकरणाचा वेग खूपच कमी होता; परंतु जुलै- ऑगस्टपासून केंद्र शासनाने पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. यामुळेच जिल्ह्यात खऱ्या अर्थाने ऑगस्टनंतरच लसीकरण मोहिमेला वेग आला. आतापर्यंत शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा करत असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २ लाख ६९ हजार ३३७ लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

पालकमंत्र्यांच्याच तालुक्यात लोक घेईनात लस

जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी व वेळ प्रसंगी लस न घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिला होता. मात्र त्यांच्याच बारामती तालुक्यातल्या ७० हजार ६०८ लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यानंतर दौंड, इंदापूर, भोर तालुक्यातदेखील अद्याप हजारो लोकांनी लस घेतलेली नाही.

एकही डोस न घेतलेली तालुकानिहाय संख्या-

आंबेगाव - ०, बारामती - ७०,६०८, भोर - ३२, हजार ३३६, दौंड- ५० हजार ७३६, हवेली - ४७ हजार ९६२, इंदापूर- ४७ हजार ९६२, जुन्नर - ७ हजार ८८६, खेड - ०, मावळ- ०, मुळशी - ०, पुरंदर - ११ हजार ८५०, शिरूर- ०, वेल्हा- ०एकूण : २ लाख ६९ हजार ३३७

जिल्ह्यात झालेले लसीकरण

पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी --५६,८७० --४८,२४५

फ्रंटलाइन वर्कर्स --१,२६,४३२ --१,००,९०५

१८ ते ४४ वयोगट --१९,३१,१४९ --१०,५४,०७९

४५ ते ५९वयोगट --७,९४,८४२ --५,३७,३४५

६० पेक्षा जास्त --५,९३,७४८ --४,१२,७६६

एकूण --३५,०३,०४१ --२,१५,३४०

४) ४० हजार जणांना कोरोना

- आतापर्यंत एकूण बाधित - २,९१,०१६

- सध्या उपचार घेत असलेले -४६१

- कोरोना बळी - ४७१४

या दोन तालुक्यांत चिंता

जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या व कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या बारामती तालुक्यात आजही तब्बल सत्तर हजारपेक्षा अधिक लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. दौंड तालुक्यातदेखील ५० हजार ७६२ लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. यामुळे भविष्यात या तालुक्यातील लोकांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉन