Pune Vaccination: पुण्यात उद्या कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद; महापौर मोहोळ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 23:57 IST2021-05-16T23:55:50+5:302021-05-16T23:57:20+5:30

Pune Vaccination: पुणे महानगरपालिकेला कोरोना विरोधी लसींचा पुरवठा न झाल्यानं पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रांवर सोमवारी लसीकरण बंद राहणार आहे

corona Vaccination stopped in Pune tomorrow due to shortage of vaccines | Pune Vaccination: पुण्यात उद्या कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद; महापौर मोहोळ यांची माहिती

Pune Vaccination: पुण्यात उद्या कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद; महापौर मोहोळ यांची माहिती

Pune Vaccination: पुणे महानगरपालिकेला कोरोना विरोधी लसींचा पुरवठा न झाल्यानं पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रांवर सोमवारी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. (Pune Vaccination: पुण्यात उद्या कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद; महापौर मोहोळ यांची माहिती)

दरम्यान, पुणे शहरात आजही ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणासाठी केवळ १५ केंद्रच उपलब्ध होती. या सर्व केंद्रांवर कोवॅक्सिन ही लस देण्यात आली. तसेच १७ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला गेला. 

शहरातील १९४ पैकी दहा केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण 
शहरातील एकूण १९४ लसीकरण केंद्रांपैकी दहा केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण करण्यात आले आहे. आजवर एकूण ९ लाख ३५ हजार ५८२ नागरिकांनी लस घेतली असून यातील १ लाख ८० हजार लसी या दहा केंद्रांवर देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या 'टॉप टेन' केंद्रांमध्ये कोथरूड, येरवडा, शिवाजीनगर, धायरी, बिबवेवाडी, पद्मावती या भागातील रुग्णालयातील केंद्रांचा समावेश आहे.

Web Title: corona Vaccination stopped in Pune tomorrow due to shortage of vaccines