शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

Corona positive news : दिलासादायक! पुण्यात दर दिवसाला ५० रुग्ण होताहेत ठणठणीत बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 12:39 PM

गेल्या आठवड्यात ४११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा आजारांनी ग्रस्त..

ठळक मुद्देसकारात्मक आकडेवारी : पॉझिटिव्ह केसेसच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्ह केसेसचे प्रमाण घटलेमृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा आजारांनी ग्रस्त

पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले असतानाच पुणेकरांसाठी दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. दिवसाकाठी साधरणपणे ५० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत. गेल्या आठवड्यात ४११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यासोबत पॉझिटिव्ह रूग्णांच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्ह केसेसचे (प्रत्यक्ष उपचार घेत असलेले) प्रमाण घटले आहे. एका आठवड्यात हे प्रमाण ७९ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. शहरामध्ये ९ मार्च रोजी राज्यातील पहिला रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ९ मार्च ते ६ मे या कालावधीत बधितांचा आकडा २ हजार २९ पर्यंत गेला आहे. या कालावधीत तब्बल ११८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत ही टक्केवारी सहा टक्के आहे. मृत्यूदराचा आकडा सहा टक्के असल्याने हा आकडा आणखी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा आजारांनी ग्रस्त असल्याचेही दिसून येत आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य व्याधींनी ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या मृत्यूची शक्यता अधिक असल्याने त्यांचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे.यामध्ये एक सकारात्मक बाब पूढे आली असून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या घटली आहे. २८ एप्रिल रोजी १३३९ पॉझिटिव्ह रुग्ण होते, तर १०५७ ?क्टिव्ह रुग्ण होते. हे प्रमाण ७९ टक्के होते. ०६ मे रोजीची आकडेवारी पहिली असता आठ दिवसात पॉझिटिव्ह केसेसमध्ये ६९० रूग्णांची भर पडून २०२९ पॉझिटिव्ह केसेस झाल्या. यापैकी १३२४ एक्टिव्ह केसेस आहेत. हे प्रमाण ६५ टक्के झाले आहे. म्हणजे एकाच आठवड्यात हे प्रमाण १४ टक्क्यांनी खाली आहे. उपचार घेऊन घरी परतणा?्यांचे प्रमाण वाढू लागल्याने एक्टिव्ह रूग्णांची संख्या घटत असल्याचे दिसत आहे. ------------------पॉझिटिव्ह केसेसमध्ये गेल्या आठवड्यात दिवसाकाठी साधारणपणे ९० ने वाढ होत असल्याचे दिसत आहे. पालिकेने स्क्रिनिंग आणि अति संक्रमित भागात स्वॅब टेस्टिंग सुरू केले आहे. यासोबतच घरोघरी सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. २८ मार्च रोजी १२२ रुग्ण एकाच दिवसात वाढले होते. त्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १३३९ वर होता. ०६ मे रोजी आकडा २०२९ वर गेला आहे. -------------------कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २८ एप्रिल रोजी ७९ होती. त्यामध्ये वाढ होत होत ०६ मे रोजी हा आकडा ११८ वर गेला आहे. या कालावधीतील आकडेवारी पहिली असता दिवसाकाठी ४ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसते आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदराचे प्रमाण ६ टक्के आहे.-------------------मागील आठवड्याभरातील आकडेवारी पहिली असता दिवसाकाठी सर्वसाधारणपणे ५० रुग्ण दिवसाकाठी बरे होऊन घरी जात आहेत. एक्टिव्ह रूग्णांचे प्रमाण पॉझिटिव्ह रूग्णांच्या तुलनेत घटले आहे. हे प्रमाण ६५ टक्क्यांवर आले आहे. ही सकारात्मक बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यासोबतच मृत्युदर कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू आहेत. - रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका