शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 21:29 IST

व्हॉट्सअप ग्रुपवर बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची छायाचित्रासह ओळख जाहिर केल्याप्रक़रणी ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे : व्हॉट्सअप ग्रुपवर बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची छायाचित्रासह ओळख जाहिर केल्याप्रक़रणी ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.पोलीसांनी याबाबत इशारा दिला होता.मात्र, पोलीसांना न जुमानता ओळख जाहीर करणे महागात पडले आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी  पोलीस नाईक पांडुरंग रंगनाथ गोरवे यांनी याप्रकरणी फिर्याद  दिली आहे. त्यानुसार  भा.द.वी.कलम १८८,५०४(२), १०९,३४ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५,कलम ५२ ,५४ प्रमाणे आरोपी योगेश अरविंद शिरसट (रा.गुणवडी ता.बारामती जि.पुणे),अनुप सुरेश देशमाने (रा.भोईगल्ली बारामती ता.बारामती जि.पुणे) ,सागर राजेंद्र पलंगे (रा.खाटीकगल्ली,बारामती)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शिरसट याने त्याचे मोबाईल वरील व्हॉट्सअपवरुन  इतर व्हॉटसअप ग्रुपवर ७ जणांचा एकत्रित छायाचित्र टाकले. त्यामध्ये एकाच्या चित्रावर जांभळ्या रंगाचे गोल मार्किंग केले.ती मार्किंग केलेली व्यक्ति कोरोनाबाधित असल्याचे,त्या व्यक्तिची ओळख जाहीर होईल,असे प्रसारीत केले. त्याखाली त्या रुग्णाच्या परीसराचा उल्लेख करुन त्या ठीकाणी आणखी दोन रुग्ण आढळल्याचा मजकुर लिहून पाठविला. तसेच आरोपी देशमाने याने एका व्हॉट्सअप ग्रुपवर खोटी अफवा पसरविली. ग्रुपमधील सदस्य कोरोना संसर्गाबाबत खोट्या मजकुराचे अफवा पसरविणारे संदेश व्हॉटसअप ग्रुपमध्ये प्रसारीत करुन जनतेत भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण करीत होते. तरी  या ग्रुपचा अ‍ॅडमिन असणाºया पलंगे याने देखील त्या ग्रुपचा अ‍ॅडमिन असताना त्याच्यावर नियंत्रण ठेवले नाहि. आरोपी देशमाने यास अपप्रेरणा देवुन सहाय्य केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.अधिक तपास पोलीस हवालदार अमोल खाडे करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcyber crimeसायबर क्राइमBaramatiबारामतीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप