पुण्यात कोरोनाचा उद्रेक; पालिकेकडून आरोग्य यंत्रणा उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:53 PM2021-03-22T12:53:00+5:302021-03-22T12:53:27+5:30

खासगी रुग्णालयांना बेड्स उपलब्ध करून देण्याचे आदेश..

Corona outbreak in Pune; The municipality is making great efforts to set up a health system | पुण्यात कोरोनाचा उद्रेक; पालिकेकडून आरोग्य यंत्रणा उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

पुण्यात कोरोनाचा उद्रेक; पालिकेकडून आरोग्य यंत्रणा उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

Next

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. नव्याने ५५० बेड्स सीसीसी उपलब्ध होत आहेत. खासगी रुग्णालयांना बेड उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्दैवाने जम्बो पुन्हा सुरु करावे लागत आहे. तेथील ५०० बेड्स सुरु होत आहेत. यात २०० सीसीसी ५० आयसीयु बेड आहेत. ५० बेड आज तातडीने सुरु करणार आहोत. बुधवारी आणखी १०० ॲाक्सिजन बेड आणि इतर बेड सुरु होणार असून शुक्रवारपर्यंत ५५० जम्बोचे नवे बेड सुरु करण्यात येतील, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.  

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सोमवारी (दि. 22) महापौर आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. महापौर मोहोळ म्हणाले, तसेच आमची खासगी रुग्णालयांची बैठक झाली असून त्यात त्यांना बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या बेड उपलब्ध आहेत.सध्याच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी असं आयसर आणि टाटाने सांगितले होते. जर ही परिस्थिती कायम राहिली तर अधिकचे निर्बंध आणावे लागतील. पक्ष कोणताही असला तरी नियमांचे उल्लंघन झाले तर कारवाई करण्यात येईल. 

महापालिका आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, सध्या २३,००० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र यापैकी फक्त २३०० रुग्ण म्हणजे फक्त १०% लोक रुग्णालयात उपचार घेत आहे. गेल्या वर्षी ही संख्या १८ ते २० टक्क्यांवर होती. याचाच अर्थ लोक वेळेवर रुग्णालयात जात आहेत. गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. 

१६०० अधिक २३०० बेड उपलब्ध होत आहेत. जम्बोचे ८०० बेड हे बॅकअपसाठी तयार होत आहे. बेड उपलब्ध आहेत. त्याची काळजी करण्याची आवश्यक्ता नाही.निर्बंधांबाबत दररोज आढावा सुरु. पोलिसांमार्फत कारवाई केली जावी याचे त्यांना अधिकार दिले गेले आहे. दररोज १७०० लोकांवर मास्क न वापरल्याची कारवाई होत असून तब्बल २८ कोटी रुपये विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल करण्यात आले आहे. कोरोना अप्रोप्रियेट बीहेव्हीअर ची आवश्यकता आहे. 

काही रुग्णालयाबरोबर एमओयु केले आहेत आज जम्बो मधले ॲडमिशन वॉर रुम मधुनच होणार आहे. दीनानाथ आणि पुना हॉस्पिटलसोबत एमओयु केलेला आहे. एमओयु करणार असून तात्काळ बेड उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच डॅशबोर्ड अपडेट करण्याबाबत सूचना देखील केलेली आहे.

Web Title: Corona outbreak in Pune; The municipality is making great efforts to set up a health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.