शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोनाचा संसर्ग; वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 01:07 IST

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

ठळक मुद्देवायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल

पुणे: पुणे शहर पोलीस दलातील (परिमंडळ 4) विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोना आजाराचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून या पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या भावाला देखील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आईलाच कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पुणे शहर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे.  पोलीस कर्मचारी हा पूर्व भागातील एका पोलिस वसाहतीत वास्तव्यास आहे. परिमंडळ चार विभागातील एका पोलीस स्टेशनला तो कार्यरत आहे. दोन दिवसांपुर्वी त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. वायसीएम येथे त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला. त्यानंतर सदर पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या लहान भावाला देखील तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या आईची प्रकृती स्थिर आहे.  कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यातच पोलीस दलातील कुटुंबियातील आईलाच करण्याचा संसर्ग झाल्यामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी चिंतेत आहेत. या घटनेमुळे पुणे शहर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील व्यक्ती व पोलीस कर्मचारी यांच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली असून सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान पोलीस कर्मचारी सेवेत असणाऱ्या पोलीस स्टेशनमधील एक अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी व एक महिला कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात आली असून त्यांना कोणताही संसर्ग झाला नसल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मात्र आजाराचा संसर्ग होऊ नये व त्यांच्या प्रकृतीची काळजी योग्य वेळेतच घेण्यात यावी यासाठी पोलीस दलाच्या वतीने त्यांना वैद्यकीय अहवालानुसार होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी गेली अनेक दिवसांपासून दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी परिश्रम घेत आहेत. मात्र आज त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला करणाचे लागण झाल्यामुळे आता पोलिस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या संपर्कात येत असून त्यांना देखील आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वत:ची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल