शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

उरुळी कांचन येथील ४७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, गुरुवारी तापामुळे रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 13:19 IST

उरुळी कांचन शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने भीतीचे वातावरण..

ठळक मुद्देसंपर्कात आलेल्या सर्व स्टाफला होम क्वारंटाईन करण्यात येणार

पुणे : (कदमवाकवस्ती) : लोणी स्टेशन येथील एका मोठ्या रुग्णालयात ४७ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ही महिलाउरुळी कांचन येथील (ता. हवेली) रहिवासी असून, अंगात ताप असल्यामुळे गुरुवारी (ता. १६) दुपारी रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना तपासणी केल्यानंतर महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल आला.तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, पूर्व हवेलीत हा पहिलाच कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला असून यामुळे उरुळी कांचन व लोणी काळभोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला. या महिलेची व तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले.पूर्व हवेली तालुक्यातील वाघोलीनंतर उरुळी कांचन शहरात शुक्रवारी रात्री १० नंतर कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. 

दरम्यान, कदमवाकवस्ती(ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या कडून खबरदारी चा उपाय म्हणून लोणी स्टेशन येथील ज्या रुग्णालयात कोरोना बाधित महिला होती.त्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत चे ग्रामसेवक,लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.दगडू जाधव व कदमवाकवस्ती कोरोना प्रतिबंधक समिती यांनी लोणी स्टेशन येथील रुग्णालयाला भेट देऊन कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व स्टाफची माहिती मागितली असून त्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिला