Pune| दिलासादायक! कोरोना रुग्णवाढ घटली, सोमवारी केवळ २२८ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:38 IST2022-02-14T17:36:17+5:302022-02-14T17:38:52+5:30
आज दिवसभरात ९२० जण कोरोनामुक्त झाले आहेत...

Pune| दिलासादायक! कोरोना रुग्णवाढ घटली, सोमवारी केवळ २२८ नवे रुग्ण
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होत असून, सोमवारी केवळ २२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ३ जानेवारी नंतर प्रथमच ५०० च्या आत रुग्ण संख्या आली असून आज पुण्यातील एकही कोरोनाबधिताचा मृत्यू झालेला नाही.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील विविध तपासणी केंद्रांवर ३ हजार ९१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली़ यापैकी २२८ जण बाधित आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ५.८२ टक्के इतकी आहे. आज दिवसभरात ९२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्याबाहेरील तीन जण उपचारादरम्यान दगावले आहे. सध्या विविध रूग्णालयात २९ जण व्हेंटिलेटरवर, १९ जण आयसीयूमध्ये तर २०२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरात आत्तापर्यंत ४४ लाख ३८ हजार ४५१ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ६ लाख ५७ हजार १८३ जण बाधित आढळून आले आहेत. यामधील ६ लाख ४२ हजार ९६८ जण कोरोनामुक्त झाले असून, ९ हजार ३३१ जणांचा मृत्यू झाला आहे.