शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

कोरेगाव-भीमाच्या पारदर्शक तपासासाठी समन्वय समिती, पोलिसांना करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 10:19 PM

कोरेगाव-भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली.

पुणे : कोरेगाव-भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली.ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी नांगरे-पाटील यांनी सर्व दलित संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व संघटनांनी प्रशासन, पोलीस यांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेवर तीव्र रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. कोरेगाव-भीमा येथील घटनेबाबत दलित संघटनांशी चर्चा करण्यासाठी विश्वास नांगरे-पाटील यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीला पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सर्व दलित संघटनांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत दलित नेत्यांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, २९ डिसेंबरला वढूला घडलेल्या घटनेत अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ३० डिसेंबरला कोरेगाव ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गाव बंद करण्याचा ठराव केला. हा ठराव असंसदीय असल्याने त्याची माहिती मिळाल्यानंतरही प्रशासनाने व पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. सोशल मीडियावर १ जानेवारीला जमायचे असे संदेश फिरत होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले. १ जानेवारीला हिंदुत्ववादी कार्यकर्ते झेंडे घेऊन जमावाने निघून २ किलोमीटरपर्यंत चालत आले. नगर रोडपर्यंत आले तरीही त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही. सणसवाडी येथे मोडतोड सुरू केल्यानंतर सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली. दलित समाजाचा विश्वास संपादन करायचा असेल तर संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि आनंद दवे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. या भागातील सर्व व्हिडीओ फुटेज तपासावे. तेथील मोबाईल टॉवरची माहिती घेऊन कोणकोणाशी संपर्कात होते, याची माहिती घ्यावी. व्हिडीओत दिसतात, त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी दलित संघटनांच्या वतीने करण्यात आली, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले की, या घटनेचा पारदर्शक तपास होईल, आपल्याकडे जे काही इनपुट असेल, ते पोलिसांना द्यावेत. पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी दलित संघटनांमधील १० जणांची समिती स्थापन करू. ते पोलिसांना मदत करतील. लोकांकडे असलेले मेसेज, व्हिडीओ याचे इनपूट देण्यासाठी त्यांनी एक मोबाईल क्रमांकही (८२०८७४६४०८) यावेळी सर्वांना दिला, त्यावर माहिती पाठविण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव