शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक गुन्हे घटले; आर्थिक, सायबर गुन्हे वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 22:21 IST

अन्य शहरातील रिसप्रॉन्स टाईम पाहता पुणे शहरातील ५ मिनिटे हा रिस्प्रॉन्स टाईम सर्वात चांगला..

ठळक मुद्देशहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे चित्रसर्व गुन्ह्यांमध्ये ८७९ ने गुन्हे घटले

पुणे : शहरातील खुनाचा प्रयत्न, शरीराविरुद्धचे गुन्हे, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोड्या, वाहनचोरी यांच्या संख्येत घट होत असतानाच आर्थिक गुन्हे आणि सायबरचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे़. त्यामुळे शहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे चित्र २०१९ मध्ये शहरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून दिसून येत आहे. पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी २०१९ मध्ये शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी सहआयुक्त डॉ़. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ़. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, मितेश गिट्टे आदि उपस्थित होते़.२०१८ च्या तुलनेत फक्त खुनाच्या गुन्ह्यात २ ने वाढ झाली असून सर्व गुन्ह्यांमध्ये ८७९ ने गुन्हे घटले आहेत. महिलांवरील अत्याचारातील विनयभंगाच्या गुन्ह्यात १९ टक्के तर, बलात्काराच्या घटनांमध्ये ६ टक्क्यांनी घट झाली आहे़. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये ११४ गुन्हे कमी झाले आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यात २९० गुन्ह्यांनी घट झाली आहे़. मालमत्तेचे गुन्हे ६८२ ने कमी झाले आहेत. 

 अन्य शहरातील रिसप्रॉन्स टाईम पाहता पुणे शहरातील ५ मिनिटे हा रिस्प्रॉन्स टाईम सर्वात चांगला असल्याचे सांगून पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, पूर्वी २० ते २५ मिनिटे रिस्पॉन्स टाईम होता. तो कमी करण्यासाठी पोलिसांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याने पुणे पोलीस सर्वात चांगला रिस्प्रॉन्स टाईम देऊ शकत आहेत. पारंपारिक गुन्ह्यांच्या संख्येत घट होत असतानाच सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे़. यंदा स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे़. सायबर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये २८० गुन्हे दाखल झाले असून ७१ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़. सायबर गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या रक्कमेपैकी यंदा तब्बल ११ कोटी ३९ लाख ३५ हजार ४५९ रुपये संबंधितांना परत करण्यात आले आहेत. २०१८ मध्ये ४ कोटी १८ लाख ५५हजार रुपये रिफंड करण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे सध्या ३५ गुन्हे तपासावर असून या गुन्ह्यांमध्ये १३५० कोटी ७ ७ लाख ५६ हजार रुपयांची मालमत्ता सरंक्षित करण्यात आली आहे़ तर २७ कोटी ४८ लाख ११ हजार ८४२ रुपये जप्त करण्यात आले आहेत. ़़़़़़़

पोलीस दलाच्या वतीने राबविलेले गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवणारा ‘स्क्रिप’ उपक्रम, गस्त, प्रतिबंधात्मक कारवाई अशा अनेक बाबींमुळे गुन्ह्यांची संख्या कमी झाली़. पुणे अमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार आहे़. प्राणघातक अपघातांची संख्या कमी झाली असली तर ती पोलिसांच्या कारवाईमुळे नाही़ तर त्याला अनेक कारणे आहेत. पुढील वर्षात वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याकडे अधिक लक्ष देणार आहोत.डॉ. के़. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.

...........

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम