वादग्रस्त फलक प्रकरण: FTII च्या पाच विद्यार्थ्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 12:02 PM2024-01-26T12:02:15+5:302024-01-26T12:02:55+5:30

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आँफ इंडिया ( एफटीआयआय ) च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात ...

Controversial board case: Five FTII students granted interim pre-arrest bail | वादग्रस्त फलक प्रकरण: FTII च्या पाच विद्यार्थ्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

वादग्रस्त फलक प्रकरण: FTII च्या पाच विद्यार्थ्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आँफ इंडिया (एफटीआयआय) च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सात विद्यार्थ्यांना न्यायालयाने प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

सायनतन चरण चक्रबर्ती, त्रिशा बंदना मन्ना, मधुरिमा मगन्का मैती, मनकप सेलोन नोकवोहम, रितागनिकी देबारती भट्टाचार्या अशी अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांवर डेक्कन पोलिस ठाण्यात कलम १५३-ब (१) (क) आणि २९५-अ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. अर्जदार विद्यार्थ्यांनी तपासात कोणताही अडथळा न आणणे, तसेच साक्षीदारांना न धमकावणे व तपास अधिकाऱ्यांनी बोलावल्यावर डेक्कन पोलिस ठाण्याला हजर राहणे या अटी-शर्तींवर विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Controversial board case: Five FTII students granted interim pre-arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.