वृक्षारोपण-संवर्धनात योगदान द्यावे

By Admin | Updated: January 25, 2017 02:19 IST2017-01-25T02:19:39+5:302017-01-25T02:19:39+5:30

पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण, वृक्षतोड अशा समस्यांवर केवळ बौद्धिक चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने स्वयंसक्रिय होऊन वृक्षारोपण

Contribute to plantation-conservation | वृक्षारोपण-संवर्धनात योगदान द्यावे

वृक्षारोपण-संवर्धनात योगदान द्यावे

पुणे : पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण, वृक्षतोड अशा समस्यांवर केवळ बौद्धिक चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने स्वयंसक्रिय होऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांनी येथे
केले.
कर्वेनगरच्या शाहू कॉलनी गल्ली क्र. ९ मधील अमृतकलश सोसायटी व स्वामी रेसिडेन्सी या सहकारी गृहरचना संस्थांतर्फे संयुक्तपणे तिळगूळ समारंभ व पर्यावरणविषयक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते.
या कार्यक्रमात स्मिात खैरे, जयश्री पाटील, अर्चना चित्रे, ज्योती तिळगूळकर, मृदुल बर्वे, राखी बर्वे, मेधा करवंदे तसेच बसराज अमाणे, विवेक मांडके, अनंत बर्वे, केदार चित्रे, सुरेश थिटे, अमित कुलकर्णी, दत्तात्रय पराडकर, मल्हार करवंदे, जितेंद्र शहा, योगेश प्रभुणे उपस्थित होते. प्रिया कुलकर्णी यांनी स्वागत, सूत्रंचालन व आभार प्रदर्शन केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Contribute to plantation-conservation